चिंदर भगवती माऊली मंदिरात २७ डिसेंबरला वार्षिक दशावतार नाट्यप्रयोग……!
विवेक परब | मुख्य संपादक :
मालवण तालुक्यातील चिंदर येथील जागृत देवस्थान श्री देवी भगवती माऊली मंदिरात, भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी आयोजित वार्षिक दशावतार नाट्यप्रयोग मंगळवार शुक्ल पंचमी २७ डिसेंबरला होणार आहे.
रात्रौ ठिक १० वाजता ‘बाळकृष्ण गोरे दशावतार’ नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार असून नाट्य रसिकांनी दशावतार नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा असे आवाहन भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी व बारापाच मानकरी यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)