कट्टा परिसरातील अंगणवाडीतील मुलांच्या विविध स्पर्धा..!
साथी बापूभाई शिरोडकर पुण्यतिथी निमित्त आयोजन.
मसुरे | प्रतिनिधी :
बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे स्वातंत्र्यसैनिक तथा मालवण प. स. चे माजी सभापती बापूभाई शिरोडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त तील मुलांच्या बडबडगीत व गोष्ट सांगणे या स्पर्धा संपन्न झाल्या. बालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
दीपक भोगटे यानी बापूभाईंच्या निस्वार्थी व सेवाभावी वृत्तीचा पालकाना परिचय करून दिला व बापूभाईना लहान मुले अतिशय आवडत असल्याने हा च्या मुलांचा मेळावा आयोजित केला आहे असं सांगितलं.कट्टा, कुसरवे, गोळवण, वाईरकरवाडी, नांदोस, काराणेवाडी, गुरामवाडी,डॉन बॉस्को इत्यादी तील ४५ मुले या स्पर्धेत सहभागी झाली होती.
या समारंभास किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, हरेश चव्हाण, दीपक भोगटे, काळसेकर सर, सुजाता पावसकर, गिरकर मॅडम, नाईक मॅडम, जाधव मॅडम, सेविका व पालक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)