ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कणकवली तालुकास्तरीय क्रीडास्पर्धांना सुरुवात…!

कणकवली तालुकास्तरीय क्रीडास्पर्धांना सुरुवात…!

प्रकाशन: 22 Dec 2022 08:37 PM
वाचन संख्या 120

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे येथे उद्घाटन सोहळा संपन्न..

संतोष साळसकर | शिरगांव :
वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे येथे कणकवली तालुकास्तरीय स्पर्धेचा भव्य शुभारंभ उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या व अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

त्यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार , माजी कणकवली तालुका सभापती दिलीप तळेकर , कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , माजी तळेरे सरपंच साक्षी सुर्वे , गटशिक्षणाधिकारी किशोर गवस , तळेरे सरपंच हनुमंत तळेकर ,उपसरपंच दिनेश मुद्रस, शशांक तळेकर,राजेश जाधव,उदय पाटील,विनय पावसकर,शरद वायंगणकर, माजी उपसभापती प्रकाश पारकर, माजी सरपंच चंद्रकांत तळेकर सहाय्यक गटविकास अधिकारी सुर्यकांत वारंग , शिक्षण विस्तार अधिकारी कैलास सावंत ,तळेरे हायस्कुलचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर , केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल , संजय पवार , गोपाळ जाधव , पत्रकार गुरुप्रसाद सावंत , पत्रकार संजय खानविलकर, सदाशिव पांचाळ,कासार्डे उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. धनश्री जाधव , सुचिता तळेकर आणि कणकवली तालुक्यातील शिक्षक , खेळाडू , पंच शिक्षक उपस्थित होते.

तळेरे हायस्कुल यांच्या वतीने लेझीम नृत्याचे उत्तम सादरीकरण करण्यात आले.मान्यवरांनी प्रज्वलित केलेली क्रीडाज्योत खेळाडूंकडे देण्यात आली. क्रीडाज्योत संचलन करण्यात आले.उमेद फाऊंडेशनच्या वतीने प्रथमोपचार पेटी वितरित करण्यात आली.क्रीडा प्रतिज्ञा घेऊन खेळाडू आणि पंच यांना सामूहिकरित्या वचन देण्यात आले.तळेरे हायस्कूलच्या गीतमंचाने सुस्वर आवाजात ईश्वस्तवन व स्वागतगीत सादर केले.

गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार म्हणाले , ” कणकवली तालुकास्तर क्रीडास्पर्धा संपन्न करण्यासाठी वामनराव महाडिक हायस्कुलचे पदाधिकारी , शिक्षक व विद्यार्थी यांनी दिलेले सहकार्य मोलाचे आहे. कणकवली तालुक्याने जिल्हास्तरावर जनरल चॅम्पियनशिप मिळवावी. ” माजी कणकवली सभापती दिलीप तळेकर यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

समारंभपूर्वक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. आभार गिल्बर्ट फर्नांडिस यांनी केले.पहिल्या दिवशी लहान व मोठ्या गटातील मैदानी सर्व खेळ , खोखो , कबड्डी , रिले , धावणे , लांबउडी , उंचउडी , गोळाफेक इत्यादी खेळ घेण्यात आले. सायंकाळी उपस्थित या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या , उपविजेत्या संघांना ट्रॉफी व प्रमाणपत्रे देण्यात आली. दुसऱ्या दिवशी समुहगीत , व ज्ञानी मी होणार या स्पर्धा संपन्न होणार आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स