ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
बांद्यात छत्रपती शिवाजी महाराज रथयात्रेचे भव्य स्वागत.

बांद्यात छत्रपती शिवाजी महाराज रथयात्रेचे भव्य स्वागत.

प्रकाशन: 22 Dec 2022 06:41 PM
वाचन संख्या 60

बांदा | राकेश परब :
  फुकेरी येथील हनुमंत गडावर रविवार २५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व तोफगाड्यांचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या रथयात्रेचे बांद्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने शहर परिसर दणाणून गेला होता.

सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व श्री देवी माऊली सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ फुकेरी यांच्या वतीने हनुमंत गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जिर्णोद्धार आणि तोफगाडा लोकार्पण सोहळा २५ डिसेंबर रोजी होणार आहे. याची जनमानसात जागृती व्हावी यासाठी दोडामार्गहून संपूर्ण जिल्हाभर रथयात्रा काढण्यात येणार आहे. दोडामार्गहून ही यात्रा आज सकाळी बांद्यात दाखल झाली.

यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, नवनिर्वाचित सरपंच प्रियांका नाईक, माजी जि. प. सदस्य श्वेता कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊळ, ग्रा. पं. सदस्य बाळू सावंत, प्रशांत बांदेकर, मकरंद तोरसकर, रत्नाकर आगलावे, शामसुंदर मांजरेकर, माजी सरपंच दीपक सावंत, म. गो. सावंत, ज्ञानेश्वर सावंत, कास सरपंच प्रविण पंडीत, सरमळे सरपंच विजय गावडे, सुभाष नाईक, निलेश देसाई, सुधीर शिरसाट, विकी कदम, एस. व्ही. नार्वेकर, बाबा गाड, संदेश महाले, हनुमंत सावंत, प्रवीण गाड आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बांदा शिवप्रेमींकडून नवनिर्वाचित बांदा सरपंच प्रियांका नाईक, कास सरपंच प्रवीण पंडीत व सरमळे सरपंच विजय गावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बांदा शहरातून ही रथयात्रा नेण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर ही रथयात्रा सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स