ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
रानगव्याच्या पिल्लास तेंडोली मध्ये जीवदान..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

रानगव्याच्या पिल्लास तेंडोली मध्ये जीवदान..!

प्रकाशन: 22 Dec 2022 05:34 PM
वाचन संख्या 88

मसुरे | प्रतिनिधी :
गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान मौजे तेंडोली तळेवाडी येथील श्री शांताराम अण्णा तेली यांच्या कठडा नसलेल्या शेतविहीरीमध्ये पडलेल्या रानगव्याचे पिल्लास जीवदान देण्यात वनविभागाला यश आले. याबाबत माजी सरपंच श्री. मंगेश प्रभू यांनी वनपाल नेरूर त हवेली धुळु कोळेकर यांना माहिती दिली असता वनपरिक्षेत्र कुडाळ चे रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्या पिल्लास सुखरूप बाहेर काढले.
विहिर परिसरात माड व काजूबागायती क्षेत्र असलेने घटनास्थळी जेसीबी मशीन अथवा क्रेन घेऊन जाणे अशक्य होते. वनपरिक्षेत्र कुडाळच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी दाखल झालेनंतर सदर 15-20 फूट खोल विहिरीमध्ये वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट यांनी शिडी व दोर याच्या साहाय्याने उतरून त्या पिल्लाच्या अंगाभोवती पट्टा गुंडाळल्यानंतर रेस्क्यू पथकातील अन्य सदस्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यास दोरीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले. त्या पिल्लाने आपल्या अधिवासात धूम ठोकताच वनविभागा च्या रेस्क्यू पथकाने तसेच स्थानिक ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला.


सदर वन्यप्राणी रानगव्याचे पिल्लू (मादी) जातीचे 1-2 वर्षे वयाचे असून त्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या अनुसूची 1 मध्ये समाविष्ट करणेत आलेले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच माहिती दिल्याने त्याचा जीव वाचवता आलेने स्थानिक ग्रामस्थांचे आभार वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ तथा सहाय्य्क वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) वनविभाग सावंतवाडी श्री. अमृत शिंदे यांनी सांगितले.
सदर कारवाई उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री .एस एन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ तथा सहाय्य्क वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) वनविभाग सावंतवाडी, धुळु कोळेकर वनपाल नेरूर त हवेली, श्रीकृष्ण परीट वनपाल मालवण, सावळा कांबळे वनपाल मठ, संजीव जाधव वनरक्षक कुडाळ, वनमजूर कदम, वाईल्ड लाईफ रेस्क्यू इमर्जन्सी संस्थेचे अनिल गावडे, वैभव अमृस्कर, सिद्धेश ठाकूर, स्थानिक ग्रामस्थ नितीन वेंगुर्लेकर, अण्णा तेली, भोगले व पोलीस पाटील तेंडोली श्री नाईक यांनी यशस्वी केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स