ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये क्रीडा दिन उत्साहात साजरा.

व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये क्रीडा दिन उत्साहात साजरा.

प्रकाशन: 22 Dec 2022 10:47 AM
वाचन संख्या 28

बांदा | राकेश परब :
श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही. एन. नाबर प्रशालेत १६ व १७ डिसेंबर रोजी शालेय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी अनेक सांघिक, वैयक्तिक खेळात सहभाग घेऊन आपले कौशल्य दाखवून दिले.

या क्रीडा दिनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नूतन विद्यालय कळणे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री संजय तायवाडे तसेच शिक्षक पालक संघाच्या सदस्या सौ रेश्मा सावंत, मधुरा शिरोडकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ मनाली देसाई, उपमुख्याध्यापिका सौ शिल्पा कोरगावकर आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वतीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्रीफळ फोडून व क्रीडा मशाल पेटवून मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी झुंबा, फ्लॉवर ड्रिल, रिंग,डंबेल एक्सरसाईज, सारी ड्रिल, एरोबिक, शिव तांडव आदि कलाकृती सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

दुसर्‍या दिवसीय पारितोषिक वितरण समारंभास    मोपा गावचे माजी सैनिक श्री कृष्णा परब प्रमुख अतिथी लाभले. आजच्या मोबाईल च्या जगतात यंत्रांना जरासे बाजूला ठेवून सुदृढ राहण्यासाठी खेळ आवश्यक आहेत, खेळाने  माणसाचे शरीर व मन दोन्ही  तंदुरुस्त  राहतात. नेहमी भरपूर खेळा असे विचार अध्यक्षीय भाषणात बोलताना व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या  विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. एकूण सर्व खेळांचे गुणांकन केल्यावर या वर्षीचा विजेता ब्लू हाऊस गट ठरला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिशा रॉड्रिग्ज, स्नेहा नाईक यांनी केले तर प्रशांत देसाई यांनी आभार प्रदर्शन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स