ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
देवगड तालुका ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपचे वर्चस्व.

देवगड तालुका ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपचे वर्चस्व.

प्रकाशन: 21 Dec 2022 02:26 PM
वाचन संख्या 147

संतोष साळसकर | शिरगांव :
देवगड तालुक्यातील ३८ ग्रा. पं. ची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली होती. पैकी पाच ग्रामपंचायती या पूर्वीच बिनविरोध झाल्याने उर्वरित ३३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली होती. मंगळवारी मतमोजणी नंतर तालुक्यातील २० हून अधिक ग्रामपंचायतींवर भाजपाने तर १३ ग्रा. पं. वर उद्धव ठाकरे शिवसेनेने दावा केला आहे. मिठमुंबरी व दाभोळे येथे माजी सरपंचांनी अपक्ष निवडणूक लढवत मिळविलेला विजय सर्वांना आश्चर्यांचा ‘धक्का’ देणारा ठरला.


मिठमुंबरी ग्रा.पं.वर भाजपाने दावा केला आहे तर गिर्ये सरपंच निवडणूक अटीतटीची झाली. यामध्ये सरपंचपदाच्या दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली. मात्र, टपाली मतदानात भाजपा सरपंचपदाच्या उमेदवारांनी तीन मतांनी आघाडी घेत विजय संपादन केला. सरपंचपदासाठी फेर मतमोजणीतही भाजपा सरपंचपदाचा उमेदवार विजयी ठरला. उध्दव ठाकरे शिवसेनेने मणचे, फणसे, खुडी ग्रा.पं. वर वर्चस्व प्राप्त करून आश्चर्याचा धक्का दिला.
देवगड तालुक्यातील निवडणूक जाहीर ३८ ग्रामपंचायतीपैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध चाफेड या ग्रामपंचायतींचा समावेश होता, तर आठ मंगळवारी तहसील कार्यालयात पार पडली. मतमोजणीनंतर काही ग्रा.पं.चे निकाल आश्चर्यकारक लागले असून राजकीय पक्षांनाही धक्का देणारे ठरले. यामध्ये लक्षवेधी राहिलेल्या सरपंच बाळकृष्ण गावकर तर दाभोळे येथेही अपक्ष ग्रा.पं. मध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार सरपंचपदासाठी रिंगणात होते.
निवडणूक निकालानंतर भाजपने चांदोशी, हडपिड, सांडवे, तोरसोळे, कुवळे, दहिबाव, किंजवडे, कोटकामते, मिठमुंबरी, नारिंग्रे, पोयरे, आरे, चाफेड, कट्टा, बापर्डे, विजयदुर्ग, म्हावळुगे, ओंबळ, पडेल, पेंढरी, सौंदळे, उंडील, वाघीवरे, वाघोटण, गवाने, , कुणकवण, पाटगाव, या ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. तर उद्धव ठाकरे शिवसेनेने १३ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. यामध्ये हिंदळे, साळशी, खुडी, मणचे, नाद, पोंभुर्ले, विजयदुर्ग, फणसे, बुरंबावडे, पाटगाव, सौंदाळे, ओंबळ, गवाणे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान, शिवसेनेने दावा केलेल्या विजयदुर्ग, ऑबळ, पाटगांव, सौंदाळे, गवाणे या ग्रा.पं.वर भाजपानेही दावा केला आहे.

मणचे ग्रा. पं. सेनेकडे, माजी सभापतींना धक्का

माजी सभापती लक्ष्मण ऊर्फ रवी पाळेकर यांच्या मतदारसंघातील मणचे ग्रामपंचायत भाजपाकडे होती. या ग्रा. पं. निवडणुकीमध्ये शिवसेना पुरस्कृत सरपंचपदाचे उमेदवार दीपक तोरस्कर यांनी ५६० मते मिळवून विजय संपादन केला. विशेष म्हणजे गत पं. स. निवडणुकीमध्ये माजी सभापतीविरोधात निवडणूक लढवून केवळ काही मतांनी तोरस्कर यांना पराभव पत्करावा लागला होता.

निवडणूक निकालानंतर भाजपाने चांदोशी हडपीड, सांडवे, तोरसोळे, कुवळे, दहिबांव, झाल्या. यामध्ये गवाणे, , पाटगांव, आरे, मिठमुंबरी सरपंचपदी अपक्ष उमेदवार व माजी किंजवडे, कोटकामते, मिठमुंबरी, नारिंग्रे, पोयरे, महाविकास आघाडीच्यावतीने सानिका किशोर रिंगणात असलेल्या चार पैकी दोन उमेदवार आरे, चाफेड, कट्टा, बापर्डे, विजयदुर्ग, महाळूंगे, सरपंच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ३३ उमेदवार व माजी सरपंच श्रीकृष्ण अनुभवणे यांनी ओंबळ, पडेल, पेंढरी, सौंदाळे, उंडील, वाघिवरे, मतदान मशिनद्वारे केलेल्या मतमोजणीमध्ये दोन्ही सर्वांचेच लक्ष लागले होते. निवडणुकीत भाजपा ग्रा.पं.साठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मिळविलेले विजय लक्षवेधी ठरले. या दोन्ही वाघोटन, गवाणे, कुणकवण व पाटगावया उमेदवारांना ६५७ अशी समसमान मते पडली. पुरस्कृत सरपंचपदाचे उमेदवार भूषण पोकळे यांनी ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. तर उद्धव ठाकरे शिवसेनेने १३ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे.

गिर्ये सरपंच निवडणुकीत भाजपाची बाजी

गिर्ये सरपंचपदाची निवडणूक अटीतटीची झाली. सरपंचपदासाठी भाजपा पुरस्कृत पॅनलच्यावतीने लता दिलीप गिरकर तर घाट्ये यांच्यामध्ये काटे की टक्कर लढत झाली. मात्र तीन टपाली मते भाजपा पुरस्कृत उमेदवारांच्या पारड्यात गेल्याने भाजपा उमेदवार विजयी झाले.

याठिकाणी फेरमतमोजणीही करण्यात आली मात्र त्यामध्ये भाजपा उमेदवार विजयी झाले. विजयदुर्गातही चिठ्ठीद्वारे भाजपा उमेदवाराला लॉटरी

विजयदुर्ग ग्रा. पं. प्रभाग २ मधील उमेदवार अभिजीत विलास जावकर व दिनेश मधुकर जावकर यांना १३२ अशी समसमान मते पडली. यावेळी चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले. यामध्ये भाजपा पुरस्कृत पॅनलचे उमेदवार दिनेश जावकर है

भाजपा तालुकाध्यक्ष सलग दुसऱ्यांदा सरपंचपदी

भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी सलग दुसऱ्यांदा सरपंच होण्याचा बहुमान पटकाविला आहे. या निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक ९३१ मते मिळवून विरोधी उमेदवाराचा ३०० हून अधिक मतांनी पराभव केला.

पडेलमध्ये भूषण पोकळे सर्वाधिक मताधिक्क्यांनी विजयी

पडेल सरपंचपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपातर्फे भूषण पोकळे निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत सरपंचपदासाठी निवडणूक भाजपा पक्षाचेच असल्याने या लढतीकडे १८६३ मते मिळवून विरोधी उमेदवाराचा सर्वाधिक ५४८ मतांनी पराभव केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स