पळसंब गावची देवडाळप स्वारी उत्साहात संपन्न…!
प्रसन्ना पुजारे | सहसंपादक :
मालवण तालुक्यातील पळसंब गावाची ग्रामदेवता आणि माहेरवाशिणींची माऊली श्री देवी जयंती व श्री देव रवळनाथ पावणाई वार्षिक डाळपस्वारी कार्यक्रम १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत पार पडली.
या स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबई कर मंडळी तसेच माहेरवाशिणी यांचा समावेश होता.
या सर्व भक्तिमय वातावरणात देवांनी पळसंब गावच्या चारही सीमा तसेच सर्व देवदेवतांची आणि गावातिल मानकरी तसेच ज्यांनी ज्यांनी सन्मानाने बोलविले त्यांच्या घरी भेट दिल्यानंतर १८ तारीख रात्री मंदिरात उत्साहात परत आले. अश्या प्रकारे सोहळा आनंदात पार पडला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)