ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी प्रशालेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला सुरुवात.

ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी प्रशालेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला सुरुवात.

प्रकाशन: 19 Dec 2022 10:57 PM
वाचन संख्या 317

विवेक परब | सहसंपादक :
वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला आज सकाळी ठीक ०८.०० वाजता सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन संस्था अध्यक्ष सदानंद राणे व संस्था सदस्य व चिंदर ग्रामपंचायत उपसरपंच दीपक सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेतील विद्यार्थी खेळाडूंना मार्गदर्शन करताना दीपक सुर्वे यांनी शालेय जीवनातच उत्तम खेळाडू बनण्याचे स्वप्न उराशी बाळगा व उत्तम नाव कमवा. खेळ हा माणसाचे आरोग्य उत्तम ठेवण्याचा उपाय आहे. तसेच सदानंद राणे यांनी वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, दररोज खेळण्याचा सराव करा. त्यामुळे शरीराला व्यायाम मिळतो. आरोग्य संतुलित राहते. आपल्यापासून रोगराई दूर पळून जाते. मन ताजेतवाने व प्रफुल्लित होते. त्यामुळे दररोज खेळण्याचा सराव ठेवा. शाळेचे क्रीडा शिक्षक वसावे सर यांनी क्रीडा स्पर्धेचे उत्तम प्रकारे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. केतकी समीर बावकर यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना खेळाची शपथ देऊन व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून सुरुवात केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स