मुणगे हायस्कुलच्या चार विद्यार्थ्यांची विभाग स्तरावर निवड…!
पवन स्पोर्ट्स फाऊंडेशनचे मार्गदर्शन.
मसुरे | प्रतिनिधी :
ओरोस येथे झालेल्या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल आणि कै. वीणा सुरेश बांदेकर ज्यू कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेसच्या चार विद्यार्थ्यांनि चमकदार कामगिरी केल्याने सातारा येथील विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
१५०० मी धावणे मध्ये
कु प्रेक्षा पुरूषोत्तम सावंत –प्रथम क्रमांक, ४०० मी धावणे कु सृष्टी अनिल सावंत–द्वितीय क्रमांक, भालाफेक- सुमित सुरेश चव्हाण-द्वितीय क्रमांक, २०० मी धावणे राहुल सुर्यकांत घाडी–द्वितीय क्रमांक, उंचउडी- राहुल सुर्यकांत घाडी–तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. चारही विध्यार्थी सातारा येथील विभागस्तर स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.
सर्व विध्यार्थ्यांना पवन स्पोर्ट्स फाऊंडेशन मुणगेचे मुख्य प्रशिक्षक अनिकेत पाटील, प्रशालेचे शिक्षक एन. जि. वीरकर, गुरुप्रसाद मांजरेकर, प्रसाद बागवे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था व प्रशालेच्या वतीने यशस्वी विध्यार्थी व प्रशिक्षक यांचे शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, व्यवस्थापक आबा पुजारे, मुख्याध्यापिका श्रीमती एम बी कुंज यांनी अभिनंदन केले. यावेळी एन जि वीरकर, प्रसाद बागवे, सौ. गौरी तवटे,गुरुप्रसाद मांजरेकर, हरीश महाले, प्रणय महाजन, झुंजार पेडणेकर, सौ रश्मी कुमठेकर आदी उपस्थित होते. संस्था अध्यक्ष न.ना. पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, व्यवस्थापक आबा पुजारे, मुख्याध्यापिका श्रीमती एम बी कुंज, पवन स्पोर्ट्स फाउंडेशन अध्यक्ष प्रशांत सारंग, माजी मुख्याध्यापक संजय बांबूळकर, डॉ मनोज सारंग, सरपंच सौ साक्षी गुरव, पोलीस पाटील सौ. साक्षी सावंत, मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)