ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरे येथील बागवे हायस्कुलचे स्नेहसंमेलन २० डिसेंबर पासून..!

मसुरे येथील बागवे हायस्कुलचे स्नेहसंमेलन २० डिसेंबर पासून..!

प्रकाशन: 19 Dec 2022 02:59 PM
वाचन संख्या 77

मसुरे | प्रतिनिधी :
मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित आर. पी .बागवे हायस्कूल आणि एमजी बागवे भरतगड उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालय मसुरे यांचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आणि स्नेहसंमेलन दिनांक २० व २१ डिसेंबर रोजी विद्यालयाच्या सभागृहात संपन्न होत आहे. मंगळवार दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता विविध स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे . उद्घाटक महेश बागवे आणि श्रीमती सरोज परब यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सकाळी साडेदहा वाजता श्री सत्यनारायण महापूजा, साडेबारा वाजता आरती व टोकळ वाडी भजन मंडळ यांचे भजन,दुपारी एक वाजता तीर्थप्रसाद व स्नेहभोजन, सायंकाळी तीन ते पाच वाजता प्राध्यापक डॉ. योगेश विलास महाडिक यांचे एम. सी. व्ही. सी. बाबत व्यवसाय मार्गदर्शन, माजी विद्यार्थ्यांची मनोगते,
सायंकाळी सहा वाजता विठ्ठल प्रसादिक भजन मंडळ मर्डेवाडी यांचे भजन.बुधवार दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी दहा ते एक वाजता माजी विद्यार्थी विविध स्पर्धा व मनोगते, दुपारी एक ते दोन माजी विद्यार्थ्यांसाठी शाकाहारी व मांसाहारी स्नेहभोजन, दुपारी तीन ते पाच माजी विद्यार्थी गीत गायन कार्यक्रम, सायंकाळी सहा ते सात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे गीत गायन कार्यक्रम, सायंकाळी सात ते आठ शालेय विद्यार्थी गुणदर्शन पर सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री 9 वाजता बक्षिस वितरण समारंभ, रात्र नऊ ते दहा शालेय विद्यार्थी गुणदर्शन पर सांस्कृतिक कार्यक्रम. यावेळी प्रमुख उपस्थिती मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई चे अध्यक्ष तथा उद्योजक डॉक्टर दीपक मुळीक परब आणि विविध मान्यवर. तरी या स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन आर पी बागवे हायस्कूल मसुरेचे मुख्याध्यापक के ए चव्हाण आणि मसूरे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स