ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
ऐश्वर्य मांजरेकर यांची "नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्प २०२२-२३" साठी निवड.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ऐश्वर्य मांजरेकर यांची "नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्प २०२२-२३" साठी निवड.

प्रकाशन: 19 Dec 2022 01:16 PM
वाचन संख्या 156

संपूर्ण देशभरातून टॉप ५० सक्रिय तरुणांची निवड.

मालवण | प्रतिनिधी : आपल्‍याला गौरवशाली भारत घडवायचा आहे. यासाठी निःस्वार्थी नेते घडविणे आपले कर्तव्य आहे. सर्वसमावेशक शिक्षण हे एक माध्यम आहे. सशक्त ,सश्रद्ध आणि सतेज युवक ही राष्ट्राची खरी शक्ती व संपत्ती असते. यासाठीच युवकांमध्ये नेतृत्व क्षमता निर्माण करण्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन द्वारे १२ दिवसांचे (२१ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३) पर्यंत राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिर (NGLC) गांधी रिसर्च फाऊंडेशन गांधी तीर्थ, जळगाव येथे आयोजित केले आहे. सदर शिबिरामध्ये क्षॆत्रकार्य मुलाकात , रोल प्ले, सामुदायिक संवाद, ग्रामीण जीवनशैली ,अनुभव प्रशिक्षण कार्यशाळा , समूह कार्य , व्याख्यान, मुसाफरी , सांस्कृतिक कार्यक्रम, कम्युनिकेशन, विविध प्रकारचे मीडिया, युवकांपुढील आव्हाने व जीवन कौशल्ये, व्यक्तिमत्व विकास व जीवन मुल्याचे शिक्षण अशा विविध बाबींची समावेश सदर कॅम्प मध्ये असेल शिबिरामधील सहभागी व्यक्तींना कणखर नेतृत्वासाठी तयार केले जाईल. या कॅम्प चे मुख्य उद्दिष्ट महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारित नेतृत्व कौशल्ये तयार करणे आणि सध्याच्या राजकीय संदर्भात त्यांची प्रासंगिकता , शांतता राजदूत विकसित करणे,पर्यावरण आणि विकास-आधारित नेतृत्व तयार करणे तरुणांना अहिंसक समाज निर्माण करण्यास प्रवृत्त करणे, सार्वजनिक प्रशासन आणि धोरणाचा पाया घालणे, तरुणांचा प्रभावी सहभाग आणि प्रशासनात त्यांचे नेतृत्व सुलभ करणे हे असून सदर शिबिरासाठी संपुर्ण भारतातील युवकांनी अर्ज केले होते, त्या मधुन टॉप ५० तरुणांची निवड या नॅशनल लिडरशीप कॅम्प साठी झाली असून महाराष्ट्र मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर या युवकाची निवड सदर लिडरशीप कॅम्प साठी झाली आहे . ऐश्वर्य व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज कुडाळ चा विद्यार्थी असुन सदर प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल समस्त सिंधुदुर्गवासियांकडून त्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स