ब्युटीज ऑन व्हिल्स ग्रुपकडून सायकलपट्टू रमेश गावडे यांचा सन्मान.
मसुरे | प्रतिनिधी :
मुंबई ते कन्याकुमारी अशी १७०० किमी सायकलिंग सफर पूर्ण करणारे श्री. रमेश गावडे यांचा नुकताच ब्युटीज ऑन व्हिल्स ग्रुपकडून कट्टा येथील
ओम गणेश साई मंगल हॉल येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी ओम गणेश साई मंगल हॉलचे मालक मामा माडये, ब्युटीज ऑन व्हीलस ग्रुपचे सदस्य डॉ. सोमनाथ परब, डॉ.सावंत,बंडू मांडये , निलेश हडकर ,सतीश कांबळी, गणेश पारकर, सोनू पारकर,रुपेश भोजणे,दुर्गेश मंडळ, अमेय चव्हाण,अमन बिरमोळे,अनिल पाटील,अमित सावंत, राजेश प्रभुलकर, नवनीत परब.चैतन्य प्रभुलकर, श्राव्य झाटये,सुरेश कांबळी, निलेश झाटये, प्रकाश सरमळकर, सौ.झाटये,सौ.माडये,सौ.गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री रमेश गावडे. यांनी आपले सायकल प्रवासा दरम्यान आलेले अनुभव व्यक्त केले. श्री गावडे यांच्या हस्ते सायकलिंगच्या विभागीय स्तरावर निवड झालेल्या श्राव्य झाटये,आणि निधी सरमळकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)