ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
बांदा येथे सरासरी ७१.२० टक्के मतदान…!

बांदा येथे सरासरी ७१.२० टक्के मतदान…!

प्रकाशन: 19 Dec 2022 11:07 AM
वाचन संख्या 40

मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण..

राकेश परब | सहसंपादक :
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असलेल्या बांदा शहर ग्रामपंचायतच्या सरपंच पदासह १४ जागंसाठी काल पार पडलेल्या निवडणुकीत ५ हजार २७१ पैकी ३ हजार ७५३ मतदारांनी (७१.२० टक्के ) मतदानाचा हक्क बजावीला. शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील निमजगा मतदान केंद्रावर दोनवेळा मशीन बंद पडल्याने सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, सावंतवाडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंखे यांनी बांदा येथे भेट देत निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली. बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे, समीर भोसले यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तसाठी तैनात होते.
बांदा शहरात प्रभाग क्रमांक १ मध्ये १२९७ पैकी ८२७ (६३.७६ टक्के) मतदारांनी मतदान केले. प्रभाग क्रमांक २ मध्ये ११०५ पैकी ८४७ (७६.६५ टक्के) मतदारांनी मतदान केले. प्रभाग क्रमांक ३ मध्ये १३७४ पैकी १०२४ (७४.४५ टक्के) मतदारांनी मतदान केले. प्रभाग क्रमांक ४ मध्ये ७७४ पैकी ५४२ (७०.०२ टक्के) मतदारांनी मतदान केले. प्रभाग क्रमांक ५ मध्ये ७२१ पैकी ५१४ (७१.२८ टक्के) मतदारांनी मतदान केले. एकूण ५२७१ पैकी ३७५४ (७१.२० टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावीला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स