ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
२५ वर्षांत राणेंच्या विचारांचा सरपंच असूनही नांदगावचा विकास का झाला नाही?

२५ वर्षांत राणेंच्या विचारांचा सरपंच असूनही नांदगावचा विकास का झाला नाही?

प्रकाशन: 17 Dec 2022 07:06 PM
वाचन संख्या 46

आमदार वैभव नाईक यांचा आमदार नितेश राणेंना सवाल.

मालवण | सुयोग पंडित :
नांदगावात मागील २५ वर्षांत सरपंच, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे राणेंच्या विचाराचे होते. त्यांच्या घरातले होते तरी देखील राणेंनी नांदगावचा विकास का केला नाही? आपल्या स्वार्थासाठी हायवे कॉन्ट्रॅक्टर बरोबर अनेक बैठक घेणारे राणे नांदगाव येथील सर्व्हिस रोड पूर्ण का करून घेऊ शकले नाहीत? स्थानिक आमदार म्हणून नितेश राणेंनी नांदगाव साठी किती निधी दिला? असा रोखठोक सवाल आ.वैभव नाईक यांनी करत नांदगावच्या विकासाची काळजी करू नका. नांदगावच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव शिवसेना शाखेसमोर आज शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाची प्रचार सभा संपन्न झाली या प्रचार सभेत आ. वैभव नाईक बोलत होते.
आ. वैभव नाईक पुढे म्हणाले, हायकोर्टाच्या निकालावर अवलंबून असणारे सरकार राज्यात आहे.सरकार अस्थिर असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार गेले ६ महिने होऊ शकला नाही. नितेश राणे कधीच मंत्रिमंडळात जाणार नाहीत. मुंबई महानगरपालिका निवडणूक झाल्यावर राज्यातील सरकार कोसळेल.आणि पुन्हा शिवसेनेचे सरकार येणार आहे. त्यामुळे नांदगावच्या विकासाची काळजी करू नका. नांदगावच्या विकासाची जबाबदारी आमची आहे अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली
यावेळी शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, कोल्हापूर शिवसेना नेते हाजी अस्लम बादशाहजी, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मज्जीद बटवाले, नांदगाव शाखा प्रमुख राजा म्हसकर, रवींद्र तेली, इमाम नावलेकर, प्रफुल्ल तोरसकर, समीर नावलेकर, समीर कुमार, तात्या निकम आदीसह नांदगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स