ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
बांद्यात श्री वाळकेश्वर प्रतिष्ठानचे देवकार्य उत्साहात..!

बांद्यात श्री वाळकेश्वर प्रतिष्ठानचे देवकार्य उत्साहात..!

प्रकाशन: 17 Dec 2022 07:37 PM
वाचन संख्या 30

बांदा |राकेश परब :
बांदा येथील श्री वाळकेश्वर प्रतिष्ठानचे वार्षिक देवकार्य असलेला पराब उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला.यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यात आले होते.
सोमवारी सकाळी मंदिरात पुजाअर्चा तसेच लघुरुद्र करण्यात आला.त्यानंतर नैवेद्य व आरती होऊन महाप्रसाद आरंभ झाला. सायंकाळी दीपोत्सवाचा कार्यक्रम झाला. यावेळी लावलेल्या दिव्यांच्या तेजाने परिसर उजळून गेला होता. मंगळवारी सकाळपासुन विविध कार्यक्रमांना आरंभ झाला.दुपारी पारंपारीक वनभोजन कार्यक्रम व त्यानंतर श्री बांदेश्वर भेटीचा कार्यक्रम झाला.आरती,नैवैद्य,महाप्रसाद होऊन कौलप्रसाद घेऊन या सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यासाठी गोवा ,कर्नाटक महाराष्ट्रासह विविध भागातून आले वाळके परिवाराचे सदस्य तसेच अनेक भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स