ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि शिवप्रेमी ग्रुप, कुडाळ यांच्या माध्यमातून अपघातग्रस्त रुग्णासाठी तत्पर रक्तदात्यांनी दिले अमूल्य योगदान .

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि शिवप्रेमी ग्रुप, कुडाळ यांच्या माध्यमातून अपघातग्रस्त रुग्णासाठी तत्पर रक्तदात्यांनी दिले अमूल्य योगदान .

प्रकाशन: 14 Dec 2022 12:14 PM
वाचन संख्या 49

सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठानचे जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर यांनी दिली माहिती.

मालवण | सुयोग पंडित : काल १३ डिसेंबरला सावंतवाडी येथील श्री विधान परमार या अपघातग्रस्त रुग्णाला GMC बांबोळी, गोवा येथे रक्तस्राव खूप झाल्याने रक्ताची गरज होती.
त्यासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि शिवप्रेमी ग्रुप, कुडाळ यांच्या माध्यमातून काही तत्पर रक्तदात्यांनी GMC बांबोळी रक्तपेढी गोवा येथे जाऊन अमूल्य असे रक्तदान केले.
या केसच्या पूर्ततेसाठी शिवप्रेमी ग्रुपचे श्री रमाकांत नाईक, श्री प्रसाद चोरगे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी तालुका सचिव श्री बाबली गवंडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री महेश राऊळ यांनी विशेष प्रयत्न केले अशी माहिती सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे पदाधिकारी तथा जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर यांनी सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानच्या अधिकृत डिजिटल सामाजीक मंचावरून दिली आहे.

खालील रक्तदात्यांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि शिवप्रेमी ग्रुप, कुडाळ यांच्या माध्यमातून रक्तदान केले.
प्रसाद चोरगे(कुडाळ),मेघा माने(कुडाळ), रोहित माने(कुडाळ), अजय भाट(कुडाळ),दशरथ राऊळ(कुडाळ), राज पवार(कुडाळ),निराकांत चव्हाण (पावशी),रुपेश वाळके (पावशी)
दैवत वराडकर (पिंगुळी)
,प्रविण गोडे (झाराप),प्रविण कुबल (शिरोडा)
,दिगंबर म्हाकले(शिरोडा)
,वासुदेव गांवकर (गोवा)
,शुभम गुरव(कुडाळ) अशी त्या रक्तदात्यांची नांवे आहेत.

तसेच श्री विजय सोन्सुरकर, धनंजय पाताडे, अक्षय सावंत, सुशांत बांबुळकर, अनुज बांदेकर, विजय वालावलकर, सिद्धेश राणे (गोवा), अभिषेक परब, संतोष माणगांवकर, गौरव केसरकर व त्यांचे चारपाच वकील मित्र हे देखील रक्तदान करण्यास जाण्यासाठी श्री बाबली गवंडे यांच्या संपर्कात होते. पण तूर्तास त्यांचे आभार मानून त्यांना थांबविले गेले असल्याची माहिती किशोर नाचणोलकर यांनी सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानच्या डिजिटल सामाजीक मंचावरुन दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स