ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत 'महाविकास आघाडीची' त्रिंबक निवडणूक प्रचाराला उत्साहाने सुरूवात.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत 'महाविकास आघाडीची' त्रिंबक निवडणूक प्रचाराला उत्साहाने सुरूवात.

प्रकाशन: 14 Dec 2022 12:22 PM
वाचन संख्या 164

श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ ठेवून प्रचाराला सुरूवात.

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचारकार्याने आता वेग घेतला आहे.
अगदी काही मोजक्या दिवसांवर ग्रामपंचायत निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामूळे प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र दिसून येत आहे.
काल श्री देव रामेश्वर मंदीर त्रिंबक येथे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुरस्कृत ‘महाविकास आघाडी’च्या सरपंच पदाच्या व सदस्य पदाच्या उमेदवारांनी आपल्या पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्रिंबक गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा आशिर्वाद घेऊन प्रचार कार्याचा शुभारंभ केला.


यावेळी त्रिंबक ,चिंदर ,आचरा विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी घटक पक्षातील वरीष्ठ नेते, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संरपंच पदाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठीही विशेष वेग आला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स