ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज संघटनेचा हळवल गावातील भाजप पुरस्कृत उमेदवारांना जाहीर पाठींबा.

सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज संघटनेचा हळवल गावातील भाजप पुरस्कृत उमेदवारांना जाहीर पाठींबा.

प्रकाशन: 14 Dec 2022 10:56 AM
वाचन संख्या 44

भाजप पुरस्कृत उमेदवारांचा करणार प्रचार.

कणकवली I ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील हळवल गावात ठाकर समाजाचे सरपंच, सदस्य पदासाठी यंदाच्या निवडणुकीत आरक्षण आहे. हळवल मध्ये याच विषयावरून राजकीय मंथन सुरु होते.
नजिकच्या भूतकाळात ठाकर समाजाचे प्रलंबित प्रश्न आदार नितेश राणेंनी मार्गी लावले तसेच पुढे निर्माण होणाऱ्या समस्या आणि प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील असे आघाडीवर रहात विश्वासात्मक आश्वासन देखील आम. नितेश राणेंनी दिले आहे.

आमदार नितेश राणेंच्या या ठोस निर्णायक भूमिकेवर विश्वास ठेवून समाज्याच्या विकासासाठी एक पाऊल पुढे जाऊन आपल्या कठीण प्रसंगी मदत करणाऱ्यांना आपण सहकार्य करावे या विचाराने ठाकर समाज जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने ठाकर समाज बांधव भाजप पुरस्कृत उमेदवारांना व पक्षाला पाठिंबा देणार असल्याची माहिती जिल्हा कार्यकारिणी सल्लागार नामदेव ठाकूर व जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रविण ठाकूर यांच्यामाध्यमातून देण्यात येत आले. या बाबत झालेल्या बैठकीत अच्चुत मसके, सचिन ठाकुर, संकेत ठाकुर, यश म्हसकर उपस्थित होते.

समाजाला भाजपा पक्ष व आमदार नितेश राणेंनी केलेली बहुमोल अशी मदत हे उद्याच्या नागरिकांचे भवितव्य घडवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकचा प्रचार भाजपा पक्षाने केलेली मदत व प्रयत्न घरा – घरात पोहोचवण्याचा निर्णय देखील ठाकर समाज बांधवांनी घेतला आहे. दोन दिवसांत गावा गावात ठाकर समाज वस्तीवर जावून समाज बांधव व – पदाधिकारी प्रचार करणार असल्याचे समाज बांधवांनी सांगितले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स