उद्या प्रहार भवनात आमदार नितेश राणे देणार विरोधकांच्या टीकेला उत्तर.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या नांदगांवातील सभेतील वक्तव्यावर विरोधी पक्षांकडून चहू बाजुंनी टीका सुरु आहे. त्या टीकेबाबत आमदार नितेश राणे यांनी दोन दिवस मौन बाळगले होते परंतु उद्या सकाळी ११ वाजता एक पत्रकार परिषद घेऊन त्या टीकेबाबत प्रत्युत्तर देणार आहेत.
भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे उद्या १४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्भूमीवर विरोधकांच्या टीकेला आमदार राणे काय उत्तर देणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.नांदगांव येथील वक्तव्याचा आधार घेऊन द विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत व त्यांला उद्याच्या पत्रकार परिषदेत ते कसे प्रत्युत्तर देतायत याचीच सध्या राजकीय वर्तुळात व जिल्ह्यात चर्चा आहे .
.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)