ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तारकर्ली क्रिकेट क्लबतर्फे ग्रामीण खेळाडूंसाठी लेदर क्रिकेट सामने खेळण्याची अनोखी संधी…!

तारकर्ली क्रिकेट क्लबतर्फे ग्रामीण खेळाडूंसाठी लेदर क्रिकेट सामने खेळण्याची अनोखी संधी…!

प्रकाशन: 13 Dec 2022 07:39 AM
वाचन संख्या 319

चला लेदर क्रिकेट खेळूया’ उपक्रमा अंतर्गत दोन टी ट्वेंटी सामन्यांमध्ये सहभाग घेता येणार.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातला ‘तारकर्ली क्रिकेट क्लब’ हा लेदरबाॅल क्रिकेट मधील गुणवत्ता,शिस्त,संधी या कसोट्यांवर लेदरबाॅल क्रिकेट संस्कृती जतन करण्यासाठी कार्यरत असा एक क्रिकेट क्लब आहे. तारकर्ली क्रिकेट क्लब ग्रामीण क्षेत्रातील लेदरबाॅल क्रिकेट प्रतिभेलाही मैदान तथा मंच उपलब्ध करुन देण्यासाठी प्रसिद्ध आहे.


आता तारकर्ली क्रिकेट क्लबने ग्रामीण भागातील खेळाडूंना लेदर क्रिकेट खेळण्याची एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे. नवीन वर्षात बुधवारी ११ जानेवारीला मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदानावर लेदर क्रिकेटचे दोन टी ट्वेंटी सामने आयोजित करण्यात आले आहेत.

या सामन्यासाठी ३०० रुपये प्रवेश शुल्क असून त्यात केळी आणि दुपारच्या नाश्त्याचीही सोय करण्यात आली आहे .
ज्या खेळाडूंना या सामन्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ३०० रुपये प्रवेश शुल्का सहित आपली नावे हर्षवर्धन रोगे ९४२०९७२५६० आणि गोविंद उर्फ बंटी केरकर – ९६३७२३२१९२ यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन आयोजक तारकर्ली क्रिकेट क्लब तर्फे करण्यात आले आहे.

सर्वात प्रथम नांव नोंदणी करणाऱ्या २६ खेळाडूंना प्राधान्याने संधी दिली जाईल अशी माहिती वजा घोषणाही तारकर्ली क्रिकेट क्लबतर्फे करण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स