कणकवलीतील सक्रीय सामाजीक कार्यकर्ते श्री. रवींद्रनाथ मुसळे कालवश.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सतत सक्रीय सामाजीक व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेले सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, कणकवली रोटरी क्लबचे पदाधिकारी व कणकवली कन्झ्युमर्स सोसायटीचे संचालक व कणकवली बाजारपेठ रहिवासी श्री. रवींद्रनाथ वसंत मुसळे यांचे आज सोमवारी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.
श्री.रवींद्रनाथ मुसळे यांना प्रकृती अस्वस्थ त्यामुळे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. कणकवली नगर वाचनालयाचे व गोपुरी आश्रमाच्या कार्यकारणीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. कणकवलीच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा मोठा योगदान होते. कणकवली शहरातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असे. कणकवली रोटरी क्लबचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून पुढील वर्षाकरिता त्यांची नुकतीच नियुक्ती देखील करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या उपक्रम व इतर तांत्रिक मदतीच्या कामातही ते सक्रिय होते.
श्री.रविंद्रनाथ मुसळे यांच्या निधनाने कणकवली शहर परिसर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)