सिंधुदुर्ग जिल्हा बँक शिरगांव शाखा व्यवस्थापकपदी श्री मोहन जंगले यांची नियुक्ती.
संतोष साळसकर /शिरगांव : देवगड तालुक्यातील शिरगांव येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक तथा ब्रँच मॅनेजर नितीन तायशेट्ये यांची कणकवली येथे बदली झाली.त्यांच्या जागी ओरोस मुख्यालयातील मोहन जंगले यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सुगंधा साटम यांच्या हस्ते माजी ब्रँच मॅनेजर नितीन तायशेट्ये यांचा भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सुगंधा साटम,नूतन ब्रँच मॅनेजर मोहन जंगले,शिरगावचे उपसरपंच अमित साटम,शिरगाव हायस्कुलचे प्राचार्य शमशुद्धीन अत्तार, सामाजिक कार्यकर्ते संभाजी साटम,जनार्दन ठुकरूल,मंगेश नार्वेकर,रोहन म्हापसेकर,पांडुरंग हुमरस्कर,प्रथमेश राणे.आदि उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)