ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चिंदर येथील सुभ्रमन्य केळकर यांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश

चिंदर येथील सुभ्रमन्य केळकर यांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश

प्रकाशन: 24 Sep 2021 10:36 PM
वाचन संख्या 257

संपूर्ण भारतात मिळवला ६५३वा क्रमांक

विवेक परब / चिंदर : येथील सुभ्रमन्य भालचंद्र केळकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या आज लागलेल्या निकालात संपूर्ण भारतात ६५३वा क्रमांक मिळवून पुन्हा एकदा चिंदर गावासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे…
गेल्यावर्षी त्यांना भारतीय पोलिस सेवा (lPS) मिळाली होती. मालवण तालुक्यातील चिंदर गावातील सामान्य कुटुंबातील मेहनती युवकाने  थेट यु पी एस सी परीक्षा पास करणे ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने व खासकरुन चिंदर गावासाठी कौतुकास्पद गोष्ट ठरली आहे.

सुभ्रमन्य यांचे वडील श्री भालचंद्र केळकर पंचक्रोशीत पौरोहित्य सेवा करतात त्यांचे मोठे भाऊ महाराष्ट्र पोलीस दलात कर्मचारी आहेत. घरची परिस्थिती बेताचीच असून त्यांनी साकार केलेले हे यश उल्लेखनीयच आहे.भाऊ पोलीस दलात लागण्यापूर्वी जेमतेम परिस्थितीच म्हणावी लागेल तरीही जिद्दीने, मेहनतीने, प्रचंड अभ्यासाने सुब्रमण्य यांनी त्यांचे ध्येय गाठले.
सध्या आय.पि.एस.केडर तामिळनाडू ही रॅन्क असलेल्या सुब्रमण्य केळकर यांची पुढे आय.ए.एस.साठी पात्र होण्याची इच्छा असून त्यात लोकसेवा आयोगाच्या  पहिल्या  तिनशे रॅन्कमध्ये येणे आवश्यक आहे.चिंदरसारख्या ग्रामीण भागात राहूनदेखिल लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रचंड समाधानकारक यश मिळवणार्या सुभ्रमन्य यांनी आय.ए.एस.च्या तयारीलादेखील सुरुवात केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 277

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स