बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा सचिवपदी किसन मांजरेकर.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या जिल्हा सचिवपदी किसन मांजरेकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय आग्रे यांनी एक वर्षासाठी ही नियुक्ती जाहीर केली आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय आग्रे यांनी ही निवड जाहीर करताना व्यक्त केला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)