ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हडपीड स्वामी समर्थ मठ येथे वटवृक्ष देवस्थान श्री दत्त देवालयाचे उद्घाटन..!

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे वटवृक्ष देवस्थान श्री दत्त देवालयाचे उद्घाटन..!

प्रकाशन: 09 Dec 2022 06:08 PM
वाचन संख्या 122

मसुरे | प्रतिनिधी :
 स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित देवगड तालुक्यातील  श्री स्वामी समर्थ मठ हडपीड येथे   श्री दत्त जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.यावेळी मठाच्या प्रवेशद्वारा नजीक नव्याने उभारण्यात आलेल्या वटवृक्ष देवस्थान श्री दत्त देवालयाचे उदघाटन डॉक्टर केशव श्रीराम पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष प्रभाकर राणे, संस्थापक सचिव श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर, श्री भांई आईर, श्री नितीन म्हापसेकर, खजिनदार श्री ज्ञानेश्वर राऊत, श्री.सत्यवान राऊत, श्री मधुकर भडसाळे श्री मारुती जंगम पुजारी आदी सह स्वामीभक्त उपस्थित होते. दत्त जयंती निमित्त श्री गणेश पूजा, पादुका पूजन, पुण्यवाचन, होमहवन, लघुरुद्र, पालखी सोहळा,
महाआरती, तीर्थ प्रसाद, नामस्मरण आणि भक्तीमय कार्यक्रम,सायं डबलबारी भजनाचा  जंगी सामना कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ,बुवा सुजित परब विरुद्ध श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ बुवा श्री. रामचंद्र (बाबा) चोपडेकर यांच्यात झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी व गाव समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स