देवगड तालुक्यातल्या नाद ग्रामपंचायत मध्ये मनसेचे ३ उमेदवार बिनविरोध.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या नाद ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने पक्षाचे खाते खोलले. देवगड तालुक्यातल्या ग्रामीण क्षेत्रातील राजकीय पटलावरील ही महत्वाची घटना असल्याचे राजकीय विश्लेषकांनी स्पष्ट केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विचारधारा, मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा वाढत जात असलेला करिष्मा तसेच मनसे नेते शिरीष सावंत, सरचिटणीस जीजी उपरकर, मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश ज. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे लॉटरी सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष नितीन पवार यांच्या प्रयत्नांमुळे मनसे लॉटरी सेनेचे देवगड तालुका उप अध्यक्ष रुपेश पांगम, विभाग संघटक बाळा गुरव, श्री. महेंद्र तांबे, श्री. रवींद्र सातम यांच्या सहकार्याने देवगड नाद गावात मनसेचे ३ ग्रामपंचायत सदस्य श्री. सुरेश नाना गुरव, सौ. राघीनी रवींद्र सातम, मयुरी महेंद्र तांबे बिनविरोध निवडुन आले आहेत असे देवगड तालुक्यातील मनसैनिकांनी स्पष्ट केले आहे.
या सर्वांचा रुपेश पांगम यांनी पुष्प गुच्छ व मनसेचा झेंडा देऊन सत्कार केला. कोरोना काळात केलेले उपक्रम, तसेच वाडी वाडीवर लावलेल्या सोलर स्ट्रीट लाईट मुळे नाद गावातील मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना विजयी केले. मतदार राजा तुम्ही दाखवलेल्या या विश्वासाला येणाऱ्या काळात साजेशी लोकसेवा समाजकारण मनसे मार्फत केली जाईल या साठी आम्ही कटीबद्ध आहोत अशी ग्वाही मनसेच्या गणेश कदम यांनी दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)