ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
माजी फेडरेशन रेफरी श्री. अशोक दाभोलकर-मेस्त्री परिवारा तर्फे जि.प.शाळा वेतोरे क्र.१ ला चॅम्पियन कॅरम बोर्ड भेट.

माजी फेडरेशन रेफरी श्री. अशोक दाभोलकर-मेस्त्री परिवारा तर्फे जि.प.शाळा वेतोरे क्र.१ ला चॅम्पियन कॅरम बोर्ड भेट.

प्रकाशन: 10 Dec 2022 06:26 AM
वाचन संख्या 151

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय स्तरावरील मैदानी खेळाचे बादशहा व माजी फेडरेशन रेफरी श्री.अशोक गणेश दाभोलकर-मेस्त्री व परिवारा तर्फे जि.प.शाळा वेतोरे क्र १ ला चॅम्पियन कॅरम बोर्ड भेट स्वरुपात देण्यात आला. नुकत्याच संपन्न झालेल्या श्री.दत्तजयंती दिवशी श्री.अशोक दाभोलकर यांचा वाढदिवस व त्यांच्या लग्नाचाही वाढदिवस होता.


अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री.दाभोलकर व कुटुंबीय त्यांच्या घरातील प्रत्येकाचे वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरे करतात व तो खर्च सामाजीक,शैक्षणिक किंवा क्रीडाविषयक देणगी तथा भेट स्वरुपात एखाद्या संस्थेला किंवा शाळेला देतात.
यंदा श्री. अशोक दाभोलकर-मेस्त्री यांच्या पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी जि.प.पू.प्रा. शाळा क्र १ दाभोली येथे महिला पालकांसाठी वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.


८ डिसेंबरला श्री. दत्तजयंतीच्या दिवशी वाढदिवस व लग्नाचा वाढदिवसा निमित्त चॅम्पियन कॅरम बोर्ड ( संपूर्ण संच ) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा वेतोरे क्र.१, वेंगुर्ला आईवडील कै. श्रीमती सुलभा गणेश दाभोलकर-मेस्त्री व कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर-मेस्त्री ह्यांच्या स्मरणार्थ भेट केला.

त्यावेळी केंद्रप्रमुख श्री. नितिन कदम, मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर हरमलकर, उपशिक्षक श्री. विश्वनाथ जांभवडेकर, उपशिक्षका श्रीमती ममता धुरी , मिनल राणे , श्रीमती दिशा राठवळ उपस्थित होत्या. त्यांच्या ह्या सामाजिक जाणीवेबद्दल सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स