आजपासून कोल्हापुरात जमावबंदीचे आदेश.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सध्या उफाळलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. त्यामुळे पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी असणार आहे. तसेच मिरवणुका तसेच सभांना देखील बंदी असणार आहे, असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिले आहेत.
आज ९ डिसेंबर पासून २३ डिसेंबर पर्यंत हा आदेश लागू असणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५२ चे कलम ३७ चे पोट कलम (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सुरू असणारे आंदोलन तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आदेश काढला आहे.
(फोटो सौजन्य | कोल्हापूर ब्युरो)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)