ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
साकेडी ग्रामपंचायतचे पाच सदस्य बिनविरोध ; भाजपचे सुरेश साटम सरपंच पदी बिनविरोध ..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

साकेडी ग्रामपंचायतचे पाच सदस्य बिनविरोध ; भाजपचे सुरेश साटम सरपंच पदी बिनविरोध ..!

प्रकाशन: 08 Dec 2022 09:22 AM
वाचन संख्या 57

आमदार नितेश राणे यांनी केले विशेष अभिनंदन.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये साकेडी सरपंच पदी भाजपाचे सुरेश साटम यांची बिनविरोध निवड झाली. तर यापूर्वी छाननी दरम्यान चार सदस्य बिनविरोध झाले होते. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ४ नामनिर्देशन पत्रं मागे घेण्यात आली. त्यामुळे आता प्रभाग क्रमांक १ मधून मोहम्मद जहूर शेख़, सुविधा सुहास गुरव, प्रभाग क्रमांक २ मध्ये प्रज्वल पांडुरंग वर्दम, विशाखा विश्वास राणे या बिनविरोध झाल्या. तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वसाधारण जागेवर दिगंबर विजय वालावलकर हे बिनविरोध झाले. सर्वसाधारण महिला या जागे करिता दोन्ही अर्ज मागे घेण्यात आल्याने एक जागा रिक्त राहिली आहे. तर अनुसूचित जाती महिला या जागे करिता मंगला विजिन जाधव व प्रेरणा प्रशांत जाधव यांच्यात लढत होणार आहे. नवनिर्वाचित सरपंच व सर्वच सदस्यांचे आमदार नितेश राणे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स