महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा सिंधुदुर्गातील एस. टी. बस सेवेवर परिणाम.
कणकवली | ब्युरो न्यूज : सध्या धुमसत असलेल्या व काही ठिकाणी उफाळलेल्या ‘महाराष्ट्र कर्नाटक’ सीमावादाचा सिंधुदुर्गातील प्रवासी एस.टी. बस सेवेवर परिणाम झाला आहे.
७ डिसेंबरला कुडाळ-बिजापूर, देवगड – बेळगांव दोन फेऱ्या, कणकवली – बेळगांव अशा बसेस चालू असून वाहकांना राज्य हद्दीपर्यंत (शिनोळी) प्रवाशांना तिकिटे देण्याबाबत व तिथून परत येण्यास सांगितले आहे. कणकवली निपाणी गाडी ही कोगनोळी पर्यंत तसेच कुडाळ – विजापूर ही फेरी सुद्धा चालू असून प्रवाशांना मिरज पर्यंत तिकीट देण्यात येत होते. कर्नाटक महामंडळाची बेळगांव- राजापूर बस परवा रात्री मुक्कामी राजापूर येथे गेली होती ती बस परवा सकाळी ६ वाजता राजापूर येथून मार्गस्थ होऊन अन्य कोणत्याही स्टँडला न जाता न थांबता सरळ आंबोली मार्गे बेळगांवकडे निघून गेली असून आज दिवसभरात एकही गाडी कर्नाटकहून सिंधुदुर्गात आली नाही आहे असे कणकवली आगार व्यवस्थापक प्रमोद यादव यांनी सांगितले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांनी कुडाळ आगार येथून बेळगांव कर्नाटक येथील बेळगांव डेपोची सरकारी बस ही उभी असताना त्याच्यावर काळ्या व भगव्या रंगाने जय महाराष्ट्र व मनसे हे बस त्या चारही बाजूने लिहून ठेवले होते. त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे.
फोटो सौजन्य : कणकवली ब्युरो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)