ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांचा नगरपरीषदेला इशारा..!

मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांचा नगरपरीषदेला इशारा..!

प्रकाशन: 08 Dec 2022 06:06 AM
वाचन संख्या 665

प्रसिद्धीपत्राद्वारे मालवण शहरातील कचरा समस्येबाबत घेतला आक्रमक पवित्रा.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे मालवणचे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी मालवणातील कचरा समस्या,कंत्राटी कामगारांचे झालेले हाल आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने एका प्रसिद्धीपत्राद्वारे नगरपरीषदेला काही सूचक इशारे दिले आहेत.

मालवण शहर हे देशाच्या पर्यटन नकाशावरील नावारुपाला येत असलेले एक प्रमुख ठिकाण असून महाराष्ट्र राज्यातील सागरी व किनारा पर्यटनात ते अग्रेसर होत आहे असे सांगताना मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी मालवण शहरवासियांनी पर्यटन विकासासाठी घेतलेली मेहनत आणि काळानुरुप वाढणारी व्यावसायिक शिस्तबद्धता याबद्दल मालवणातील लहान मोठे पर्यटन व्यावसायिक, व्यापारी व सामान्य नागरीकांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. परंतु गेला
काही कालावधी मालवणात अधून मधुन उद्भवणारी कचरा समस्या ही व्यावसायिक प्रगतीसाठी घातक असून मालवण शहर मनसे याबाबत आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.
मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे , मनविसे अध्यक्ष श्री.अमित ठाकरे, राज्य सरचिटणीस परशुराम ऊर्फ जिजी उपरकर तसेच जिल्ह्यातील , तालुक्यातील , शहरातील ज्येष्ठ मनसैनिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनविसे यांच्या साथीने मालवण शहरात मनसे सामान्य नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी सज्ज असल्याचे माजी मनसे शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे सांगितले आहे.

मालवणात देश विदेशतून लाखो पर्यटक पर्यटनासाठी येत असतात पण त्याच मालवण शहरामध्ये ठीक ठिकाणी असलेल्या कचऱ्याचा ढीग दिसणे हे म्हणजे निसर्गाने भरभराटीचे व सौंदर्याचे वरदान दिलेल्या आपल्या शहराची कुठे तरी बदनामी करण्याचा अनाहुतपणे प्रयत्न होत नाही ना याचा नगरपरीषदेने आता विचार केलाच पाहिजे असा सल्ला विशाल ओटवणेकर यांनी दिला आहे.

सद्य स्थितीत या सर्व गोष्टींसाठी मालवण नगरपालिका जबाबदार असल्याचाच आपला आरोप असल्याचे मनसे मालवण माजी शहरप्रमुख विशाल ओटावणेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘स्वच्छ आणि सुंदर मालवण’ असा स्पर्धात्मक विजय मिळवलेल्या मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांना पगार न देताच ठेकेदाराने थेट ठेका सोडल्याने मालवणात कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून मुख्य रस्ते व परिसर वगळता अन्य भागात कचऱ्याचे ढिगच्या ढीग साचले ही खंत असून आठवड्याभरापूर्वी संबंधित ठेकेदाराने आपण ठेका सोडत असल्याने १ डिसेंबर पासून कामावर येऊ नये असे कंत्राटी कामगारांना सांगितले. नगरपालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला कंत्राटी कामगारांच्या ठेक्यापोटी धनादेशच न दिल्याने ठेकेदाराने ठेका सोडल्याचे ठेकेदार प्रतिनिधींनी सोमवारी पगारा विषयी जाब
विचारण्यास गेलेल्या कामगारांना सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांच्या पगाराबाबत संबंधित ठेकेदाराकडून अनेक वेळा विलंब झाल्याने, तसेच ठरलेल्या पगारापेक्षा कमी पगार दिला गेल्याने तसेच काहीवेळा पगार ठेवल्याच्या निषेधार्थ यापूर्वी कंत्राटी स्वच्छता कामगारांनी अनेक वेळा काम बंद आंदोलन छेडले होते. मात्र हा प्रश्न त्या त्या वेळी काही अंशी सोडवून पगाराबाबत पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत असल्याने कामगारांना काम बंद आंदोलनाचे हत्यार वारंवार उपसावे लागले होते.
या सर्व गोष्टींचा परिणाम मालवण च्या स्वच्छतेवर होत असल्याचा दिसून येत आहे. मालवण नगरपालिकेने या वर लवकरात लवकर तोडगा काढावा व मालवण शहर हे स्वच्छ करावे नाहीतर मनसे नेते जी जी उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मनसैनिक मालवण शहरातील कचरा पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणून ओतू असा इशारा माजी मनसे शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी दिला आहे. कोरोना काळानंतर आर्थिक घडी विस्कटून गेलेले व्यापारी व व्यावसायिक यांना सगळे नव्याने सुरु करावे लागले. त्यासाठी शहरातील मुलभूत सुव्यवस्था राखली जावी एवढी अपेक्षा सामान्य नागरीक करु शकत नाहीत का, असा सवालही विशाल ओटवणेकर यांनी केला आहे.
सामान्य मालवणी नागरीक व व्यावसायिक यांना सध्या प्रशासकाचा कालावाधी चालू आहे किंवा इतर नाहक राजकारणात स्वारस्य नसून रोजगार, व्यवसाय व आरोग्यासाठी प्रत्येक जण झटत असल्याने मनसे नेहमीच सामान्य जनतेच्या सोबत आहे व त्यांच्या समस्यांच्या निवारणासाठी आग्रही राहील अशी भावना मनसे मालवण माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या प्रसिद्धीपत्राद्वारे दिलेल्या संदेशातून मालवण नगरपरीषद तत्काळ ठोस पावले उचलेल आणि यापुढे स्वच्छतेच्या बाबतीत होणारा अनियमितपणा कायमस्वरूपी थांबेल अशी आशा मनसे मालवण माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे व्यक्त केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स