ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणातील अनेक महाविद्यालयीन युवक मनविसेत सामील.

मालवणातील अनेक महाविद्यालयीन युवक मनविसेत सामील.

प्रकाशन: 08 Dec 2022 07:15 AM
वाचन संख्या 175

मनविसे अध्यक्ष श्री अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश.

मनविसे जिल्हा संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, तालुका अध्यक्ष संदीप लाड व उप जिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली झाला प्रवेश.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या अनेक महाविद्यालयीन युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या विचारधारेची प्रेरणा घेऊन मालवण मधील विविध महाविद्यालयाच्या युवकांनी मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला असल्याची माहिती मिळत आहे.

मनसे राज्य सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे जिल्हा संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे व मनविसे उपजिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे तालुकाध्यक्ष संदीप लाड यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश घेतला गेला.तसेच तालुक्यात मनसे विद्यार्थी सेना प्रबळपणे काम करत असल्याचे व आणखीन जोमाने करणार असल्याचे मनविसे तालुकाध्यक्ष संदीप लाड यांनी सांगितले
यावेळी मनसे माजी तालुका अध्यक्ष विनोद सांडव, माजी विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ नेते अमित इब्रामपूरकर , मनसे माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर तालुका सचिव विल्सन गिरकर, मनविसे युवती तालुकाअध्यक्ष प्राजक्ता पार्टे,मनविसे उपतालुकाध्यक्ष जनार्दन आजगांवकर,मनविसे तालुका संपर्क अध्यक्ष दीपक गुराम,मनविसे विलेपार्ले उपविभाग अध्यक्ष अभिजित मेथर,वैभव आजगांवकर,दर्शन सावजी,मिलिंद तेली,संकेत वायरकर,तुषार जुवेकर,ऋषीकेश सांवत, गौरेश माळगावकर, यतीन माजगावकर,मयूर कदम,अंकित पेडणेकर,यश दळवी,सुजल गावकर,तेजस गांवकर,सिद्धेश आंग्रे,साईल मसुरकर,शुभम कुमार,कृणाल मेस्त्री,योगेश परब,रोहन शेलटे,संकेत गोसावी,नारायण कुडाळकर,यश हडकर,सौरभ कदम,कौशल माने ,प्रसाद गावडे,विशाल जाधव,गोपाळ पेडणेकर,शिवराज लोंढे आदी उपस्थित होते तसेच मुंबईत व ठाणे अधिकारी वर्ग उपस्थित होते

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स