ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा उद्या जत्रोत्सव..!

श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा उद्या जत्रोत्सव..!

प्रकाशन: 07 Dec 2022 03:12 PM
वाचन संख्या 29

बांदा | राकेश परब :

बांदा येथिल प्रसिद्ध श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दि.८ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे   जत्रोत्सवा पासुन श्री बांदेश्वराच्या दर सोमवारी होणाऱ्या पालखी प्रदक्षिणा सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे.

Article image

गुरुवार दि.८ डिसेंबर रोजी सकाळी श्री बांदेश्वर श्री भुमिका मंदिरात पुजा अर्चा होऊन दर्शन, श्री भुमिका माऊली ओटी भरणे,नवस बोलणे,नवस फेडणे कार्यक्रमास आरंभ होईल. रात्रौ ठिक ९.३० वाजता श्रींचा मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा सोहळा आरंभ होईल. पालखी सोहळा झाल्यानंतर वार्षिक नित्य पुराण वाचन कार्यक्रमाची सांगता होईल . त्यानंतर जत्रोत्सवानिमित्त खानोलकर दशावतार मंडळाचा पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे.

 शुक्रवार दि.९ डिसेंबर रोजी सकाळी  दहिकाला होईल.त्यानंतर वाजत गाजत श्रींची पालखी फेरी नदीघाटावर श्रीकृष्ण स्नानासाठी जाईल व स्नान करुन पारंपारिक मार्गाने मंदिराकडे परत येईल.

 शनिवार दि.१० जानेवारी रोजी दुपारी  समाराधना कार्यक्रम होईल.भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री  बांदेश्वर भुमिका देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स