मुटाट हायस्कूलच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड..!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
सिंधुदुर्ग जिल्हा खो-खो असोसिएशन ची १८ वर्षांखालील मुलांची निवड चाचणी कुडाळ येथे संपन्न झाली. या स्पर्धेत डॉ.श्री.र.लेले हायस्कूल आणि कै.जा.शि.राणे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने वर्चस्व प्रस्थापित केले. मुटाट हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील १) दिक्षा नितीन पाळेकर (१२ वी) सिद्धी रविंद्र नाटेकर (११ वी ) प्राची रविंद्र परब (१० वी ) सानिया विलास पाळेकर (९ वी ) या चार विद्यार्थिनींची निवड रोहा, जि. रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)