कोकिसरे रेल्वे फाटकाजवळ कोकण कन्याच्या इंजिनमध्ये बिघाड ; प्रवाश्यांचा खोळंबा.
वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी नजिकच्या कोकीसरे रेल्वे फाटकाजवळ आल्यानंतर इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कोकण कन्या एक्सप्रेस बंद पडली. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही घटना आज सकाळी ८ च्या दरम्यान घडली.
मुंबईहून गोव्याकडे कोकण कन्या एक्सप्रेस जात असताना कोकिसरे रेल्वे फाटका पासून काही अंतरावर अचानक बंद पडली. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ट्रेन बंद पडली अशी माहिती प्राप्त झाली आहे. रेल्वे बंद पडल्याने या मार्गावरील सेवा विस्कळीत झाली. राजापूर स्टेशन वरून नवीन इंजिन उपलब्ध करण्यात आले आहे. कोकण कन्या परत वैभववाडी रेल्वे स्थानकाच्या फलाटावर नेण्यात आली. कोकण कन्या बंद पडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)