साळशी नाईकवाडी येथील श्री दत्त मंदिरात आज दत्तजयंती उत्सव..!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील साळशी नाईकवाडी येथील श्री दत्त मंदिरात आज ७ डिसेंबरला दत्त जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दिवशी सकाळी दत्ताचे मूळस्थान निवई या ठिकाणी सकाळी अभिषेक, पुजा, आरती, गाऱ्हाणे, नवस बोलणे – फेडणे, तीर्थ प्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाईक वाडी येथील दत्त मंदिरात सकाळी अभिषेक, दत्त मुर्ती पुजा, आरती, गाऱ्हाणे, तीर्थ प्रसाद, सांयकाळी दत्त जन्म सोहळा, राजी महाप्रसाद, सुस्वर भजन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वरील सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)