मुंबईत एम.सी.झेड.एम.ए. च्या कार्यालयामध्ये आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचे आंदोलन.
आ.वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याने वायरी, दांडी,सर्जेकोट,मसुरे खोत जुवा तळाशील, देवबाग, मेढा राजकोट, येथील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची मंजूर झालेली प्रकरणे सीआरझेड परवानगी मुळे आहेत रखडलेली.
सीआरझेड परवानगीची प्रकरणे पुढील बैठकीत समाविष्ट करण्याचे पर्यावरण प्रधान सचिव प्रवीण दराडे यांचे आश्वासन.
मुंबई | ब्युरो न्यूज : एम.सी.झेड.एम.ए.च्या आज संपन्न झालेल्या बैठकीच्या अजेंड्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व मालवण तालुक्यातील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची सीआरझेड परवानगीची प्रकरणे डावलली असल्याने आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मुंबई नरिमन पॉईंट येथील एम.सी.झेड.एम.ए. च्या कार्यालयामध्ये आंदोलन केले.यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची सीआरझेड परवानगीची प्रकरणे पुढील बैठकीत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे वायरी, दांडी,सर्जेकोट,मसुरे खोत जुवा तळाशील, देवबाग, मेढा राजकोट, येथील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची प्रकरणे मंजूर झाली आहेत. मात्र सीआरझेड परवानगी मुळे ही कामे थांबली आहेत. गेले काही महिने पाठपुरावा करून देखील कामांना मान्यता देण्यात आलेली नाही. तसेच आजच्या बैठकीत देखील सदर प्रकरणे अजेंड्यावर घेण्यात आलेली नाहीत त्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पंढरी तावडे, संदेश कानडे,अनंत पाटकर, अमोल पाटकर ,अक्षय देसाई, अजय रोहरा, चिले आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.