ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दिव्यांग दिन साजरा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दिव्यांग दिन साजरा.

प्रकाशन: 07 Dec 2022 10:01 AM
वाचन संख्या 93

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळरे याठिकाणी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी गटसंधान केंद्र कणकवलीचे विषेशतज्ज्ञ भाऊसाहेब कापसे, नितीन पाटील,नितेश तेली, साळिस्ते केंद्र मुख्याध्यापक सत्यवान घाडीगावकर, शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर,प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. तसेच वामनराव महाडीक विद्यालयाच्या विध्यार्थ्यांनी आपल्या दिव्यांग विद्यार्थी बंधूंना आपल्या हक्कांची आणि समाजाला कर्त्यव्यांची जाणीव व्हावी यासाठी जनजागृतीपर प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी ‘दिव्यांगांचे शिक्षण-प्रगतीचे लक्षण , दिव्यांगांना साथ द्या- मदतीचा हात द्या , दिव्यांगांना शिकवू-समाजात त्यांना टिकवू’ अशा प्रकारच्या घोषणाही देण्यात आल्या. गट संधान केंद्र कणकवली व वामनराव महाडीक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विध्यार्थ्यांचा शाळेतील आनंद द्विगुणित व्हावा याउद्देशाने उंच उडी, पेल्यात नाणे टाकणे, धावणे(रिले), संगीत खुर्ची अशाप्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रशालेच्या एम.डी.देसाई सांस्कृतिक भवनामध्ये बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. गटसंधान केंद्र कणकवलीचे भाऊसाहेब कापसे यांच्या कार्याला सलाम देत प्रशालेच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन त्यांचा उचित सन्मान सत्कार करण्यात आला, प्रशालेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना पदक व शैक्षणिक वस्तू देवून गौरिवण्यात आले. याप्रसंगी माणूस शरीराने नाही तर मनाने अपंग असू नये आणि हेच मानसिक अपंगत्व त्याचा प्रगतीचा अडसर बनते , अपंग व्यक्तींचा मनापासून आदर करायला आपण सजग असलं पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून करत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. पदाधिकारी भाऊसाहेब कापसे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात राहूनच शिक्षण दिले पाहिजे,सर्वसाधारण मुले आणि दिव्यांग मुले यांच्यामध्ये फरक करू नये असे सांगितले. यावेळी गट साधन केंद्र या कणकवलीचे नितीन पाटील व नितेश तेली यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- रंगभरण स्पर्धा– प्राथमिक गट-प्रथम क्र. रिषभ चव्हाण,द्वितीय-अमृता तळेकर,तृतीय-तेजस जंगले,माध्यमिक गट- प्रथम क्र. विश्वजीत चव्हाण, द्वितीय-भाग्येश पाटकर,उंचउडी-प्रथम क्र. रोहन कुलकर्णी, द्वितीय- भाग्येश पाटकर, तृतीय- दीप कुमठेकर, पेल्यात नाणे टाकणे– प्रथम क्र. चैत्रा खटावकर, द्वितीय- विश्वजीत चव्हाण, संगीत खुर्ची-प्रथम क्र.रिषभ चव्हाण, द्वितीय-भाग्येश पाटकर,तृतीय-दीप कुमठेकर, धावणे प्रथम क्र.विश्वजीत चव्हाण,द्वितीय क्र.दीप कुमठेकर,तृतीय क्र.अमृता तळेकर, ( विभागून)-चैत्रा खटावकर,तेजस जंगले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेची विद्यार्थिनी कु.सुस्मिता गुरव हिने तर आभार प्रशालेची विद्यार्थिनी कु.सायली बांदिवडेकर हिने मानले. प्रशालेच्या सहा.शिक्षिका डी.सी.तळेकर व प्राध्यापिका एस.एन.जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स