ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीतील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाण पुलाच्या बॉक्सेलचे बांधकाम आठवड्याभरात तोडणार…!

कणकवलीतील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाण पुलाच्या बॉक्सेलचे बांधकाम आठवड्याभरात तोडणार…!

प्रकाशन: 07 Dec 2022 07:56 AM
वाचन संख्या 49

पुढील काही महिने वाहतुक पोलिस यंत्रणेची लागणार कसोटी.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतल्या राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्या उड्डाण पुलाच्या बॉक्सेलचे बांधकाम आठवड्याभरात तोडले जाणार आहे.
कणकवली शहरातील नॅशनल हायवे उड्डाणपूल जोडणाऱ्या बॉक्सेल चा निकृष्ट बांधकाम केलेला भाग येत्या आठवड्याभरात तोडण्यात येणार आहे. ४ ते ५ महिन्यांत हे बांधकाम पूर्ण होऊन उड्डाणपुलावरून पूर्ववत वाहतूक सुरू होईल. दरम्यानच्या काळात दुतर्फा सर्व्हिस रोडवरून वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सूत्रांकडून देण्यात आली. कणकवली शहरातील एस एम हायस्कुल नजीक लीना ऑप्टिशियन समोर उड्डाण पुलाला जोडणाऱ्या बॉक्सेल चे बांधकाम निकृष्ट झाले होते. उड्डाणपुलावरून वाहतूक जरी सुरू झाली असली तरीही त्या निकृष्ट बांधकामाच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून त्या भागावरून वाहने ये जा करणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली होती. सदर निकृष्ट बांधकामामुळे उड्डाणपूलावरून होणाऱ्या वाहतुकीवेळी मोठा अपघात होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेत महामार्ग प्राधिकरण ने सदर निकृष्ट बांधकाम काढून नव्याने बॉक्सेल बांधण्याचे आदेश ठेकेदार कंपनीला दिले होते. त्यानुसार येत्या आठवड्याभरात सदर निकृष्ट बांधकाम काढून त्याठिकाणी नविन बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी किमान ४ ते ५ महिन्यांचा कालावधी लागणार असून या काळात सर्व वाहतूक दुतर्फा सर्व्हिस रोडवरून सुरू ठेवण्यात येणार आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणा चा फटका या दुरुस्ती काळात वाहतूक कोंडी सारख्या समस्यांमुळे शहरवासीय आणि पादचारी तसेच वाहनचालकांना बसणार आहे. तसेच या दरम्यान वाहतूक पोलीस यंत्रणेची वाहतूक कोंडी सुरळीत ठेवताना कसोटी लागणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स