ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीचे तहसीलदार श्री. आर. जे. पवार कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित.

कणकवलीचे तहसीलदार श्री. आर. जे. पवार कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित.

प्रकाशन: 06 Dec 2022 07:32 PM
वाचन संख्या 77

सुप्रसिद्ध क्रिकेट विश्लेषक श्री. सुनंदन लेले यांच्याकडून झाले पुरस्काराचे वितरण.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे तहसीलदार श्री. रमेश पवार यांना दैनिक सकाळ समूहाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला ‘आयडॉल महाराष्ट्राचे कोकणरत्न’ पुरस्कार नुकताच एका शानदार सोहळ्यात वितरीत करण्यात आला. गेले अनेक वर्ष महसूल सेवेत कार्यरत असणाऱ्या तहसीलदार श्री. पवार यांनी केलेल्या लोकाभिमुख कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तहसीलदार कार्यालयाच्या आवारात उभारलेला ७५ फुटी ध्वजस्तंभ या सोबतच आपत्ती निवारण असो किंवा अन्य कोणतेही मदत कार्याचे काम असो कणकवली तहसीलदार हे नेहमीच अग्रभागी असतात. सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना न्याय देण्याची भूमिका तहसीलदार श्री. पवार नेहमीच घेत असतात. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध हॉटेल सयाजी मध्ये हा सोहळा संपन्न झाला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स