मालवणच्या 'फुले शाहू आंबेडकर' विचार चळवळीच्या कार्यकर्त्यांनी दिली चैत्यभूमीला भेट.
मालवण | सुयोग पंडित : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणातून ‘फुले शाहू आंबेडकर’ विचार चळवळीच्या काही कार्यकर्त्यांनी दादर येथील चैत्यभूमीला आज भेट दिली.
रंजन तांबे, नेहा रंजन तांबे, मनिषा रेवंडकर, महेश कोळंबकर, आशा कोळंबकर,वैष्णवी कोळंबकर, विनय कोळंबकर, सिद्धार्थ जाधव, स्मिता जाधव, साहील जाधव,अशोक मोरे,अर्चना मोरे,ॠतुजा मोरे,अमित पवार,अपूर्वा पवार या कार्यकर्त्यांनी चिपी विमानतळ येथे एकत्र येत आज दुपारी विमानाने मुंबईकडे प्रयाण केले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्बोधक विचारांची ‘झेप’ समाजातील प्रत्येक घटकाने घ्यावी यासाठी हे सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील असणार आहेत आणि त्याकरिता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी हा विशेष छोटेखानी दौरा आयोजीत केला गेल्याची माहिती या सर्व ‘फुले शाहू आंबेडकर’ विचार चळवळीच्या कार्यकर्त्यांनी दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)