कणकवलीत पोलिस पेट्रोल पंपावरील खाजगी कंत्राटी कर्मचार्यांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन.
कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतल्या पोलीस ठाण्याच्या बाहेर पोलीस कल्याण निधीसाठी हिंदुस्तान पेट्रोलियमचा पेट्रोल डिझेल पंप गेल्या ४ वर्षा पासून कार्यरत आहे. या पेट्रोल पंपावर १२ जण खाजगी कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहेत. परंतु अचानक खासगी कंत्राटदराने या कर्मचाऱ्यांचा पगार १००० रुपयांनी कमी केल्याने नाराज झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रविवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून काम बंद आंदोलन छेडले.
त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली आहे.
तसेच संबंधित ठेकेदाराने चर्चेसाठी एक प्रतिनिधी पाठवला होता. त्याने कोणतीही कागदपत्रे व किमान वेतन देण्याबाबत आश्वासन न दिल्याने हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निश्चय कामगारांनी केला आहे. कणकवली पोलीस ठाण्याच्या बाहेर पोलीस कल्याण निधी अंतर्गत मानव संसाधन विभागामार्फत हिंदुस्तान पेट्रोलियमचा पंप पेट्रोल व डिझेल पंप चालवण्यात येत आहे. या पंपावर खाजगी लेबर ठेकेदाराकडून गेल्या चार वर्षापासून रोखपाल, हिशोबनीस व पेट्रोल, डिझेल सोडणारे कर्मचारी असे दहा ते बारा कर्मचारी कार्यरत आहेत. त्या ठिकाणी एका नव्याने एका संस्थेला ३० तारखे पासून ठेका देण्यात आला आहे. त्याने अचानक वेतन कमी केल्यामुळे गेल्या चार वर्षापासून कार्यरत असलेले कर्मचारी संतप्त झाले आहेत. किमान वेतन प्रमाणे मानधन मिळावे, प्रोव्हेडंड फंड व अन्य मागण्यासाठी काम बंद आंदोलन कायम ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे सबंधित ठेकेदाराने या कामगारांना काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. पोलीस आता यावर अधीक्षक काय निर्णय घेणार याकडे लक्ष सर्वांचे आहे.
आंदोलनात संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रशांत घाडीगांवकर, अमोल नाईक, भिकाजी कदम, महेश कदम, किशोर गुरव, ओंकार चव्हाण, निलेश राणे, दीपक मडवळ, मंगेश सावंत, राजेश परब, शिवराम दळवी, प्रसाद घाडी आदीचा सामावेश आहे. आहेत.
( फोटो सौजन्य : कणकवली ब्यूरो)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)