आचरा येथील 'घारे यांचे दत्त मंदिर' येथे दत्तजयंती उत्सव.
विवेक परब | एडिटोरीअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा वरचीवाडी येथील ‘घारे यांच्या दत्त मंदिरात’ उद्या बुधवारी ७ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता श्री दत्त जन्म उत्सव साजरा केला जाणार आहे.
या निमित्त मंगळवार दिनांक ६ डिसेंबर सकाळी १० वाजल्यापासून ते बुधवार दिनांक ७ डिसेंबर सकाळी १० वाजेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे .भाविक भक्तांना ल भजन प्रेमींना हरिनाम सप्ताह दरम्यान नामःस्मरण, कीर्तन, गायन, भजन, दिंडी नृत्य अशा प्रकारची सेवा करावयाची असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पंकज(राजू) घारे (मोबा. ९४०४६०७९७०) यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)