ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
नांदोस येथे ८ डिसेंबरला मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन .

नांदोस येथे ८ डिसेंबरला मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन .

प्रकाशन: 06 Dec 2022 04:26 AM
वाचन संख्या 90

ह्युमन राईट्स असोशिएशन फॉर प्रोटेक्शन (सिंधुदुर्ग ) व लायन्स आय हाॅस्पिटल नेत्रालय (कणकवली ) यांचा संयुक्त उपक्रम.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदोस येथे यंदा १० डिसेंबर दिवशी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट्स असोशिएशन फॉर प्रोटेक्शन( सिंधुदुर्ग ) व लायन्स आय हाॅस्पिटल नेत्रालय (कणकवली) यांच्या सयुक्त विद्यमाने ८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते २ या वेळेत सुरेश सदाशिव पेडणेकर (नांदोस-सोनारवाडी) यांच्या घरी, मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. लाभ घेणार्‍यांना मोतीबिंदू ऑपरेशन्स लेन्स बसवणे आणि चष्मे अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येतील.
‘फेको तंत्रज्ञानाद्वारे’ बिन टाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियातिरळेपणा व बाल नेत्रोपचार, अचूक चष्मा नंबर, शस्त्रक्रिया पूर्वक सखोल तपासणी व्यवस्था, बाह्यपटल व अंतरपटल शस्त्रक्रिया विशेष नेत्र तज्ञांकडून करण्यात येईल. नोंदणी संपर्कासाठी सौ. संजना गावडे श्री उल्हास सावंत ( ८०१०५२६६४२), सौ. मिनल पार्टे( ९३७२६८८६५७ ), श्री. रितेश सावंत( ९३५६६७४८०५ ),
यांच्याशी संपर्क करून नाव नोंदणी करावी असे आवाहन ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ( सिंधुदुर्ग ) मालवण अध्यक्ष श्री. सुधीर धुरी, तालुका सचिव श्री. राजेशकुमार लब्दे, मालवण तालुका संघटक श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स