चिंदर येथे श्री. दत्तजयंत्ती उत्सव.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ‘श्री समर्थ सद्गुरु केशवदास महाराज संस्थान’, चिंदर गावठणवाडी येथे बुधवार ७ डिसेंबरला श्री. दत्तजयंती उत्सव सोहळा साजरा होणार आहे. सकाळी श्रीं ची विधीवत महापूजा, संध्याकाळी ७.३० वा. किर्तन, ८.३० वा. श्री. दत्तजन्मोत्सव सोहळा, आरती, पालखी सोहळा तसेच गुरुवार ८ डिसेंबरला सकाळी श्रीं ची विधीवत महापूजा, संध्याकाळी ७ वाजता स्थानिक भजने, महाप्रसाद, आरती, पालखी सोहळा असा कार्यक्रम होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)