ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार वैभव नाईक यांची 'रस्त्यांची जबाबदारी माझीच' अशी कबुली…!

आमदार वैभव नाईक यांची 'रस्त्यांची जबाबदारी माझीच' अशी कबुली…!

प्रकाशन: 24 Sep 2021 02:47 PM
वाचन संख्या 95

आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट व प्रांजळ स्वरुपात मांडली भूमिका

मालवण | वैभव माणगांवकर: मालवण-कुडाळ तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे जनता व वाहन चालक यांना त्रास होत आहे. राजकीय आरोपही केले जात आहेत. मात्र रस्त्यांची जबाबदारी माझीच आहे असे प्रांजळ मत आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले आहे. हे रस्ते मे, जून महिन्यातच मंजूर करण्यात आले आहेत. पावसाळा असल्यामुळे रस्त्यांची कामे सुरू झाली नाहीत. मात्र दसऱ्या नंतर रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली जाईल. चौके कुडाळ, कांदळगाव मसुरे या प्रमुख रस्त्यांसह तालुक्यातील ९ रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. तर कुडाळ तालुक्यातील १४ रस्ते कामांना मंजुरी मिळाली आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी मालवण शिवसेना शाखा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत गेल्या दोन वर्षांत झालेल्या कामांपैकी १०० कोटींचे बिले ठेकेदारांची देणे आहेत. यासाठी बांधकाम मंत्री व अर्थ मंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच निधी मंजूर होईल अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकप्रमुख गणेश कुडाळकर, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेविका सेजल परब, पंकज सादये, तपस्वी मयेकर, उमेश मांजरेकर यासह अन्य उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स