ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
डेगवे येथे आजपासून संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन.

डेगवे येथे आजपासून संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन.

प्रकाशन: 05 Dec 2022 08:09 AM
वाचन संख्या 37

बांदा | राकेश परब : पतंजली योग समिती डेगवे यांचे संयुक्त योगोपचार शिबिर आज सोमवार दिनांक ५ डिसेंबर २०२२ ते १० डिसेंबर २०२२दरम्यान आयोजीत झाले आहे. सकाळी ५:३० ते ७ या वेळेत १० डिसेंबर पर्यंत रोज हे शिबिर संपन्न होणार आहे . सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन तसेच योगोपचार आणि आध्यात्मिक उन्नती बाबत विशेष वर्ग होतील.
या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठी विशेष मार्गदर्शन दिले जाईल. माध्यमिक विद्यालय पटांगण डेगवे (श्री देव स्थापेश्वर मंदिर शेजारी ) येथे सदर शिबिर होणार आहे. सर्व योगाभ्यास प्रेमींनी या योगशिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक व योग शिक्षकांनी केले आहे.

या संदर्भातील अधिक माहितीसाठी सर्व श्री.शेखर बांदेकर ९८२३८८१७१२, सुदन केसरकर ९४२२०६५१५३ ,मधुकर देसाई ७५८८५७०८८७ , तात्या स्वार ९४२३३०२०९० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स