ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पळसंब गांवातील 'आचरेकर घर' येथे १० डिसेंबरला मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

पळसंब गांवातील 'आचरेकर घर' येथे १० डिसेंबरला मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

प्रकाशन: 03 Dec 2022 06:06 PM
वाचन संख्या 164

ह्युमन राईटस् असोशिएशन फॉर प्रोटेक्शन( सिंधुदूर्ग )व
श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांचा संयुक्त उपक्रम ; लायन्स आय हाॅस्पिटल कणकवलीचे विशेष तंत्रज्ञान सहकार्य
.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथे १० डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट्स असोशिएशन फॉर प्रोटेक्शन( सिंधुदुर्ग ) आणि श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब,
लायन्स आय हॉस्पिटल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमानाने १० डिसेंबर रोजी सकाळी १० ते २ या वेळेत पळसंब शाळा क्र. १ जवळील मुख्य हमरस्त्यावरील ‘आचरेकर घर’ येथे मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.


लाभ घेणार्‍यांना मोतीबिंदू ऑपरेशन्स लेन्स बसवणे आणि चष्मे अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येतील. ‘फेको तंत्रज्ञानाद्वारे’ बिन टाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियातिरळेपणा व बाल नेत्रोपचार, अचूक चष्मा नंबर, शस्त्रक्रिया पूर्वक सखोल तपासणी व्यवस्था, बाह्यपटल व अंतरपटल शस्त्रक्रिया विशेष नेत्र तज्ञांकडून करण्यात येईल.

नोंदणी संपर्कासाठी श्री . जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री उल्हास सावंत
( ९४२१२६२९८७), सदस्य
श्री . हितेश सावंत
( ८७६७०७९७६५), श्री . वैभव परब ( ९४२०११५८३५),
श्री.अमित पुजारे ( ९४२०४०५९४२)
यांच्याशी संपर्क करून नांव नोंदणी करावी असे आवाहन ह्युमन राईट्स असोशियशन फॉर प्रॉटेक्शन ( सिंधुदुर्ग ) मालवण अध्यक्ष श्री सुधीर धुरी, तालुका सचिव राजेशकुमार लब्दे, मालवण तालुका संघटक श्री चंद्रकांत गोलतकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स