ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वामनराव महाडीक कनिष्ठ महाविद्यालयात कवी बा.भ.बोरकर जयंती उत्सव संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वामनराव महाडीक कनिष्ठ महाविद्यालयात कवी बा.भ.बोरकर जयंती उत्सव संपन्न.

प्रकाशन: 03 Dec 2022 05:29 AM
वाचन संख्या 52

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये डाॅ.एम. डी.देसाई सांस्कृतिक सभागृहात मराठी व कोकणी भाषेचे काव्यरचनाकार श्रेष्ठ कवी तसेच पद्मश्री पुरस्काराने सरकारकडून गौरविलेले कविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या जयंतीनिमित्ताने सुप्रसिद्ध लेखक, कवी, गझलकार, कथालेखक श्री.प्रमोद कोयंडे यांचा कवी बा. भ. बोरकरांच्या कवितांचे वाचन-गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व कवीवर्य बा.भ.बोरकरांच्या प्रतिमा पूजनाने झाली. याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश कथन केला . सोबत बा. भ. बोरकरांच्या कवितांबद्दल थोडक्यात माहिती दिली. प्रशालेची विद्यार्थिनी कु.सायली बांदिवडेकर हिने बा.भ. बोरकरांच्या व्यक्तित्व व साहित्य विषयी संक्षिप्त परिचय करून दिला.

वामनराव महाडीक विद्यालयाचे विद्यार्थी देवेन अनिल दुखंडे, श्रावणी हिरोजी तळेकर, रोहन उमेश कुलकर्णी, मिताली गोपाळ चव्हाण, स्नेहल संतोष तळेकर, दिया किशोर कांबळे, गौरी बाळकृष्ण भोगले, वरूण रवींद्र जठार, विराज संजय नांदलस्कर यांनी बा.भ.बोरकरांच्या कवितांचे वाचन-गायन करून कार्यक्रमास रंगत आणली.
बा.भ. बोरकर जयंती निमित्ताने बाबांच्या कवितांचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा या दृष्टीने कवी प्रमोद कोयंडे यांनी ‘बोरकरांच्या कवितांचे वाचन केले तसेच भावार्थ कथन केला. याप्रसंगी प्रमोद कोयंडे यांनी पांयंजणा, जलद भरुनी आले, स्वातंत्र्याची सिंहगर्जना, जीवन त्यांना कळले हो, तू गेल्यावर, इतुक्या लवकर येई ना मरणा, ज्ञानदेव गेले तेव्हा, सगळे काही सरते रे, स्वातंत्र्याचा दीपोत्सव, आले भरतें ग इत्यादी प्रसिद्ध मराठी व कोकणी कवितांचे वाचन व आशय प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर प्रमोद कोयंडे यांनी केलेल्या ‘ पांयंजणा ‘ या कवितेच्या सुरेल गायनाने उपस्थित विद्यार्थीवर्गावर गारुड केले. अंतिमतः ‘ आले भरतें ग’ या कवितेच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाची बहार द्विगुणित केले.
कार्यक्रमाचे नियोजन वामनराव महाडीक कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. एन.पी.गावठे व प्रा. ए बी कानकेकर यांनी केले. या कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेची विद्यार्थिनी सुष्मिता गुरव व आभार साक्षी नेवरेकर हिने मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स